“Book Descriptions: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने "१ जानेवारी १८१८ - कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव " हे पुस्तक पूर्ण झाले आहे कळविण्यास अत्यंत आनंद होतो. सदर पुस्तक वितरणासाठी १५ डिसेंबर २०२१ पासून उपलब्ध होईल. ______ तिसरे इंग्रज-मराठा युद्ध व कोरेगाव भीमाच्या या लढाईचे तत्कालीन अस्सल संदर्भ, कागदपत्र उपलब्ध आहेत. या सर्व संदर्भाच्या अभ्यासातून, ही लढाई जातीअंताची लढाई नव्हती असे कळून येते. तर प्रत्यक्षात ही लढाई तत्कालीन राजकारणासाठी आणि सत्ताकारणासाठी झाली. १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमाची लढाई चालू असताना स्वतः सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे दुसरे बाजीराव पेशवे यांसह फौजेसोबत होते.इंग्रजी सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते तसेच मराठा सैन्यातही विविध जाती धर्माचे सैनिक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीही कोरेगावच्या युद्धास जातीअंताची लढाई कधीच म्हटलेले नाही. याउलट जातीवादी कारणांमुळे महार बांधवाना इंग्रजांनी आपल्या सैन्यात प्रवेश बंदी केली म्हणून १ जानेवारी १९२७ रोजी कोरेगाव लढाईच्या स्मरणार्थ इंग्रजांनी बांधलेल्या जयस्तंभ परिसरात सभा घेऊन इंग्रजांच्या विरोधात आंदोलन पुकारले. याशिवाय या लढाईचे अनेकविध पैलू या पुस्तकातून उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. हे पुस्तक आपल्यासमोर सादर करताना अतिव आनंद होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहेच. आपण या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद द्याल अशी आशा करतो. - ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवदकर (१ जानेवारी १८१८ कोरेगाव-भीमा लढाईतील शौर्यवीर आणि जयस्तंभाचे इनचार्ज खंडोजी जमादार माळवदकर यांचे ७वे वंशज)” DRIVE