“Book Descriptions: शिवाजी राजांचे शत्रू दोन होते. उघडशत्रू व गुप्तशत्रू. उघडशत्रूपेक्षा गुप्तशत्रू फार खतरनाक असतात. कारण उघडशत्रू विरुद्ध डावपेच आखता येतात. पण गुप्तशत्रूची कटकारस्थाने लवकर न समजल्याने डावपेच आखता येत नाहीत. औरंगजेब, अफजलखान, शाइस्तेखान, दिलेरखान हे शिवरायांचे उघडशत्रू होते. राजांचे त्यांच्याशी राजकीय शत्रुत्व होते. धार्मिक युद्ध नव्हते. ते उघडशत्रू असल्यामुळे राजांनी त्यांना प्रत्येक वेळी पराभूत केले. पण शिवरायांना गुप्त शत्रूंनी फार चाळले. अफजलखानाच्या भेटीच्या प्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी राजांवर तलवारीने वार केला. वाईच्या ब्राम्हणांनी अफजलखानाला सहकार्य केले. रायबाघीण उदाराम देशमुख ही मोगलांसाठी आजन्म शिवरायांविरुद्व लढली. जंजिरा किल्ला शिवरायांना जिंकता येऊ नये, यासाठी मुरगूड नांदगाव येथील जोशीने सिद्धीला मदत केली. राज्याभिषेकाला मोरोपंतासह महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी विरोध केला. गागाभट्टाने राजांना खूप त्रास दिला. पुरंदर युद्धाच्या प्रसंगी दिलेरखानचा विजय व्हावा यासाठी पुण्याच्या ४०० ब्राह्मणांनी 'कोटीचंडी' यद्न्य केला. मोरोपंत पिंगळे, अण्णाजीदत्तो, उमाजी पंडित, राहुजी सोमनाथ यांनी शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला. अण्णाजीदत्तो, राहुजी सोमनाथ यांनी शिवरायांचा खून केला. पेशव्यांनी 'शिवशक' बंद केला. टिळक, सावरकर, अत्रे, पुरंदरे, साळगावकर, बेडेकर, य. दि. फडके, प्रधान हे आधुनिक काळातील राजांचे कसे शत्रू आहेत, हे आता आपण वाचा, विचार करा, आणि भयमुक्त -भयमुक्त व्हा.” DRIVE