BookShared
  • MEMBER AREA    
  • तणकट Tanakat (Novel)

    (By Rajan Gavas)

    Book Cover Watermark PDF Icon Read Ebook
    ×
    Size 20 MB (20,079 KB)
    Format PDF
    Downloaded 570 times
    Last checked 7 Hour ago!
    Author Rajan Gavas
    “Book Descriptions: ग्रामीण भागातल्या स्वार्थी प्रवृत्ती आणि या प्रवृत्तीशी होणारा मूल्यात्मक संघर्ष
    साहित्य अकादेमी पारितोषिक २००१

    तणकट गेल्या दोन- तीन दशकात समाजकारणातील आणि राजकारणातील आणि राजकारणातील दिशाहीनता आणि मूल्यभ्रष्टता यांचा विदारक दस्तऐवज असे राजन गवस यांच्या ‘तणकट’ या कादंबरीचे यथार्थ वर्णन करता येईल. विविध जातीतील नवशिक्षित तरुणांना हतबल करून टाकणारे समकालीन वास्तव गवस यांनी प्रवाहीपणे मांडले आहे. ज्वलंत समस्या, आदर्शांचे विडंबन, मूल्यांचा ऱ्हास आणि चळवळींच्या विपरीत फोफावण्यातूनजाणवणारी उपक्रमशीलतेची निरर्थकता यांचे सावट मानवी संबंधातील मौलिकता कशी ग्रासून टाकते याचे शोकात्म प्रत्यंतर म्हणजे ‘तणकट’.

    निखळ स्वार्थाच्या एकलक्षी पूर्तीसाठी लागणारी अविचारी आक्रमकताआणि मूल्यविवेकाच्या जोपासणीतून जन्मणारी असहायता यातील चिरंतन द्वंद्व बाळासाहेब शेडबाळे आणि कबीर या व्यक्तिरेखा जिवंतपणे साकारतात. कागदी प्रसिद्धीच्या आधुनिक तंत्रातून निर्माण झालेल्या बेगडी नेतृत्वाची निरंकुश सत्तालोलुपता गवस यांनी दाहकपणे चित्रित केली आहे. व्यापक उलाढालींचा व्यक्तीव्यक्तींच्या संबंधावर होणारा गुंतागुंतीचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मतेने या कादंबरीत येतो हे ‘तणकट’ या कादंबरीचे यश आहे. वर्तमानाची जटिलता अधिकृत इतिहासात हरवून जाते या तत्त्वाची प्रतीती कादंबरी आणि इतिहास-लेखन यात तफावत करण्यासाठी उपयुक्त ठरते.”

    Google Drive Logo DRIVE
    Book 1

    काळेकरडे स्ट्रोक्स

    ★★★★★

    Pranav Sakhdev

    Book 1

    Yuganta: The End of an Epoch

    ★★★★★

    Irawati Karve