“Book Descriptions: प्रस्तावना तुमच्या खास मित्राने— फुरसुंगीच्या फास्टर फेणेने आपल्या पराक्रमांनी वीस पुस्तकं भरून टाकली. ती वीसही पुस्तकं तुमच्यापैकी कुणाकुणाच्या आई-बाबांनी, दादा-ताईंनी वाचली आहेत नक्कीच ! कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय ! कारण हा फा. फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ महाराष्ट्र टाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाह&” DRIVE