“Book Descriptions: आपण दुसर्याला आवडत नाही म्हणून दु:खीकष्टी होणार्या लोकांची संख्या भरपूर असते. मानवी दु:ख किंवा वेदना विविध रूपं घेऊन माणसाला त्रस्त करते. बुद्धाने दु:खाची मुळं तृष्णेत शोधली. डॉ. अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञाने दु:खाचं मूळ माणसाच्या चुकीच्या विचारपद्धतीत शोधलं. ज्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र पद्धतीला म्हणजेच रॅशनल इमोटिव बिहेविअर थेरपीला (आर. ई. बी. टी.) डॉ. एलिस यांनी जगभरात लोकप्रिय केलं त्या उपचार पद्धतीच्या प्रणेत्याचा अवघा बौद्धिक, भावनात्मक आणि तात्त्विक जीवनपट या आत्मचरित्रात्मक कादंबरीने अत्यंत प्रत्ययकारी रीतीने मांडला आहे. मराठीत तरी मानसोपचारासारख्या क्लिनिकल विषयावरची ही पहिलीच कादंबरी.” DRIVE