“Book Descriptions: लक्ष्मीबाई टिळक यांच्या अद्भूतरम्य जीवनाचा पट या आत्मचरित्रातून उलगडतो. मराठी साहित्यातील अगदी मोजक्या पारदर्शी आत्मचरित्रापैकी हे एक. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता लक्ष्मीबाई यांनी अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत एक सुसंस्कृत आयुष्य जगल्या. मात्र हा केवळ व्यक्तिगत इतिहास नाही, तर १८६० ते १९२० या दरम्यान च्या काळातील समाजाचे चित्रणही यातून स्पष्ट होते. त्या काळातील सामाजिक स्थिती, स्त्रियांचा समाजातील दर्जा, त्यांचे प्रश्न, धर्मासंबंधी मते आदींचे दर्शनही त्यांतून होते. लक्ष्मीबाई यांची भाषाही साधी, सरळ, ओघवती आहे. जे आहे, जसे घडले, जसे भावले, तसे सांगितले, असा भाव लेखनात आहे. त्यामळे ते सुंदर, सुघड झाले आहे.” DRIVE