“Book Descriptions: विजय तेंडुलकरांचे 'सखाराम बाईंडर' रंगमंचावर आले १९७२मध्ये आणि त्याच वर्षात समीक्षक, कथित अश्लीलमार्तंड यांनी टीकेची झोड उठवल्यामुळे कोर्टाची पायरी चढाव्या लागलेल्या या नाटकावर अखेर बंदी आणण्यात येऊन त्याचा अकाली अंत झाला. सेन्सॉरसंमत झालेले हे नाटक सखाराम, चंपा आणि लक्ष्मी यांच्यातील दृश्ये आणि शिव्यांसह असलेले संवाद यामुळे वादग्रस्त ठरले होते. कोर्टाने हे नाटक पाहून सुचविलेल्या प्रत्येक कट्च्या वेळी रंगमंचावर लाल दिवा लागत असे. यामुळे रसभंग होत असे. शेवटी हे नाटक पाहायला आलेल्या न्यायमूतर्निंईच हा लाल दिव्याचा 'व्यत्यय' काढून टाकायला लावला होता. अनेकदा तर हे नाटक पा(डा)हायला येणारे प्रेक्षक नाटकातच गुंगून जात. या नाटकाच्या विरोधात खटला लढविणार्या एका वकिलांच्या सौभाग्यवतींनीच या नाटकात आक्षेपार्ह असे काय आहे? असा सवाल केल्यावर त्यांचेच पतीराज नाटकावर बंदी यावी म्हणून खटला लढवित आहेत, असे त्यांना सांगावे लागले होते.
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून ... 'सखाराम बाईंडर' हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक नाटक आहे. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग इ.स. १९७२ मध्ये झाला. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजीत याचे भाषांतरही झाले न्यूयॉर्क शहरात दीर्घकाळ पर्यंत प्रयोग होत राहीले.” DRIVE